साहेब, कशाला मिस कॉल मारता ?

Foto

जलसंपदात गोंधळवाडा 


 गोदावरी महामंडळाच्या लघुपाटबंधारे विभाग क्रमांक १ मधील कर्मचारी पॉझिटिव्ह तर दुसरा कंटेनमेंट झोन मध्ये अडकला आहे. कोरोनाच्या धास्तीने  कर्मचाऱ्यांत घबराट असताना साहेब, मात्र कंटेनमेंट झोनमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याला मिस-कॉल मारून  कामावर बोलवत आहेत. साहेबांच्या या प्रतापाने  सदर कर्मचारी धास्तावला असून साहेब, नका हो मिस कॉल मारु, अशी आर्जव करीत आहे.
तब्बल तीन महिने सुरू असलेले जनजीवन आता सुरू  सुरळीत सुरू झाले आहे.  शासकीय कार्यालये तसेच खाजगी उद्योगही सुरू झाल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. गेल्या सोमवारी लघुपाटबंधारे विभाग क्रमांक एक मधील एका कर्मचाऱ्याला ता भरला.  तपासणीअंती तो पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे इतर कर्मचारी धास्तावले. सगळ्यांची तपासणी सुरू झाली. इकडे मात्र तेहतीस टक्के कर्मचाऱ्यावर चालणारा जलसंपदा विभाग अधिक अडचणीत आला. तर पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याच्या संपर्कात तब्बल पंधरावीस कर्मचारी आल्याने सर्वच भीतीच्या सावटाखाली आहेत. विषेशत: लेखा विभागातील कर्मचाऱ्यांना हुडहुडी भरली आहे. वरिष्ठांना मात्र काम हवे आहे. कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला याची माहितीही वरिष्ठांनी दडवून ठेवल्याचा आरोप कर्मचारी करीत आहेत. वेळीच याबाबत माहिती दिली असती तर इतर कर्मचाऱ्यांची  आरोग्य तपासणी तातडीने करण्यात आली असती असा दावा कर्मचारी करीत आहेत.  दुसरीकडे वरिष्ठ मात्र पॉझिटिव्ह कर्मचारी निघाल्याचे नाकारत असल्याचे समजते. या विभागात दररोज राजकीय कार्यकर्ते, नेते तसेच शेतकऱ्यांची ये जा असते.  त्यामुळे ही संपर्काची साखळी ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
साहेबांचे मिस कॉल !
  दरम्यान गारखेडा परिसरात राहणाऱ्या एका सहाय्यक अभियंत्याच्या घराजवळ  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने परिसरातील केला आहे. असे असतानाही वरिष्ठ अधिकारी मात्र या कर्मचाऱ्याला कामावर येण्याचा दबाव टाकत आहेत.  सकाळपासूनच साहेबांचे मिस-कॉल सुरू होत असल्याने कर्मचारी चांगलाच हादरून गेला आहे.  साहेब फोन करू नका असा निरोप देऊनही साहेबांचे मिस-कॉल वर मिस कॉल सुरू असल्याने साहेब कारवाई तर करणार नाही ना ? अशी शंका  त्याला सतावत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker